नाशिक :विदर्भातील यवतमाळ येथून मुंबईकडे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल कंपनीच्या बसला अपघातानंतर ( private passenger bus caught fire in Nashik ) आग लागली. त्यामुळे आगीत अनेक जणांचा होरपळून मृत्यू झाला ( passenger burnt to death in Nashik ) आहे. तर 34 नागरिक अत्यंत गंभीर स्वरूपात भाजलेले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. तसेच ते शासकीय आयोजित दौरा चंदिगढ येथे असताना पालकमंत्री दादा भुसे तेथून त्वरित माघारी फिरलेले होते. सध्या ते घटनास्थळी दाखल होण्यासाठी जलदगतीने निघालेले आहेत.
चौकशीचे आदेश :नाशिक बस दुर्घटनेच्या चौकशीचे देखील आदेश मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. दुर्घटनेसाठी कोणी जबाबदार असल्यास कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी :पंतप्रधान नरेंद्र मोदींनीनाशिक येथील बस दुर्घटनेने हळहळ व्यक्त केली आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्यासाठी मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहेत. असे पंतप्रधान यांनी ट्विटमधून म्हटले ( PM Narendra Modi On Nashik Bus Accident Fire ) आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह :नाशिकच्या अपघातवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट केले ( Union Home Minister Amit Shah ) आहे.नाशिक येथील रस्ता अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे.या भीषण अपघातात ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि जे जखमी आहेत. ते लवकरात लवकर बरे होवो अशी मी प्रार्थना करतो. अशा भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अपघातवर व्यक्त केल्या आहेत.
पाच लाखांच्या मदतीची दादा भुसेंची घोषणा :दरम्यान नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे ( Guardian Minister Dada Bhuse ) यांनी मृताच्या नातेवाईकाला पाच लाख रुपये देण्याची घोषणा ( assistance of Rs 5 lakh to the kin of the deceased ) शासनाने केली असल्याचे सांगितलं. तसेच ते शासकीय आयोजित दौरा चंदिगढ येथे असताना पालकमंत्री दादा भुसे तेथून त्वरित माघारी फिरलेले आहेत. सध्या ते घटनास्थळी दाखल होण्यासाठी जलदगतीने निघालेले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस :नाशिकच्या दुर्घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या संवेदना नाशिकमध्ये खाजगी बस आणि टँकर अपघाताची घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या आप्तजनांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि स्थानिक अधिकारी हे स्वतः घटनास्थळी असून मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत. सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया :नाशिकमध्ये खाजगी बस आणि टँकर अपघाताची घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या आप्तजनांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि स्थानिक अधिकारी हे स्वतः घटनास्थळी असून मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत. सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. त्यांना तातडीने आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना.आमच्या सहकारी आ. देवयानीताई फरांदे या सुद्धा रुग्णालयात असून समन्वय ठेवून आहेत. ( MP Supriya Sule on Nashik Bus Accident Fire ) या भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्यात.
विरोधी पक्षनेते अजित पवार :अपघातातील जखमींना वैद्यकीय उपचार व मृतांच्या नातेवाईकांना सरकारनं आर्थिक मदत करावी. अशा अपघातांची पुनरावृत्ती व प्रवाशांचे मृत्यू टाळण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. असे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar on Nashik Bus Accident Fire ) यांनी म्हटले आहे.