नाशिक -येथील गंगापूर भागात राहणाऱ्या भारती जाधव या गर्भवती महिलेला मध्यरात्री तीन वाजता प्रसव कळा सुरू झाल्या. कल्पना या आपल्याला वयोवृद्ध सासू सासऱ्यासह रुग्णालयात जाण्यासाठी घरा बाहेर पडल्या. मात्र, रस्त्यावरुन जाणारे एकही वाहन त्याच्या मदतीसाठी थांबले नाही अशात गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी मदतीसाठी धाव घेत पोलीस वाहन बोलावून त्या महिलेला रुग्णालयात पोहोचविले आणि अवघ्या वीस मिनीटांत त्या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
नेमके काय घडले
प्रसव कळा सुरू झाल्याने गंगापूर भागात राहणाऱ्या कल्पना जाधव या आपल्या वयोवृद्ध सासू सासऱ्यासह मध्यरात्री 3 वाजता घराबाहेर पडल्या आपल्याला कोणीतरी मदत करेल या हेतूने त्यांनी रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहने थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या मदतीला कोणच थांबत नव्हते. एकीकडे कल्पना यांना प्रसव कळा असाह्य होत असल्याने त्या मदतीसाठी रस्त्यावर आक्रोश करत होत्या. अशात गस्तीवर असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक नितीन पवार यांचे वाहन समोर आले वयोवृद्ध सासर्याने त्यांचे पाय धरत आमच्या सुनेला वाचवा अशी विनवणी केली. पवार आणि सहकाऱ्यांनी तत्काळ नियंत्रण कक्षाला माहिती दिली. काही मिनिटातच गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे गिरीश महाले, राहुल सोळसे, सचिन सुफले, भारत बोळे दुसरे वाहन घेऊन आले. त्या महिलेला रुग्णालयता दाखल केले. आरोग्य केंद्रात अवघ्या वीस मिनिटात भारती यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. नातेवाईकांनी पोलीसरूपी देव भेटल्याचे सांगत त्यांच्या अश्रूला वाट करून दिली. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या हस्ते गंगापूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.