महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनासंदर्भात टिक टॉकवर पसरवली अफवा, चौघांना अटक - fake information on tiktok about corona

कोरोना विषाणूसंदर्भात टिक टॉकवर अफवा पसरवणाऱ्या चौघांना मालेगाव येथील विशेष पोलीस पथकाने अटक केली आहे. समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल, असा आक्षेपार्ह मजकूर असलेला व्हिडिओ प्रसारित केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

कोरोना संदर्भात टिक टॉकवर पसरवली अफवा
कोरोना संदर्भात टिक टॉकवर पसरवली अफवा

By

Published : Apr 3, 2020, 7:27 AM IST

नाशिक- कोरोना विषाणूसंदर्भात टिक टॉकवर अफवा पसरवणाऱ्या चौघांना मालेगाव येथील विशेष पोलीस पथकाने अटक केली आहे. समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल, असा आक्षेपार्ह मजकूर असलेला व्हिडिओ प्रसारित केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

याप्रकरणी मालेगाव ग्रामीण पोलिसांनी चार जणांविरुद्ध आझादनगर आणि रमजाणपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून चौघांना ताब्यात घेतले आहे. यापैकी तीन आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, एका आरोपीला आज न्यायालयात हजर करणार आहेत.

टिक टॉक ॲपवर आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याचे लक्षात येताच मालेगाव अपर पोलीस अधीक्षक यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाने त्यांना ताब्यात घेतले. पुढील तपास मालेगाव शहर पोलीस करत आहेत. तसेच कोणीही सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केले असल्यास ते तात्काळ डिलिट करण्याचे आदेश दिले आहेत. तर, कठोर कारवाईचाही इशारा नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details