महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिंडोरी घरफोडीचा पोलिसांनी १५ दिवसात लावला छडा, चोरांच्या आवळल्या मुसक्या - robbers are arrested in nashik

दिंडोरी तालुक्यातील मोहाडीमध्ये शिवाजी भाऊ ढेपले यांच्या घरी झालेल्या चोरीचा तपास 15 दिवसांच्या आत लावत पोलिसांना चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

दिंडोरी घरफोडीचा पोलीसांनी १५ दिवसात लावला छडा
दिंडोरी घरफोडीचा पोलीसांनी १५ दिवसात लावला छडा

By

Published : Feb 13, 2020, 11:37 PM IST

नाशिक - दिंडोरी तालुक्यातील मोहाडीमध्ये शिवाजी भाऊ ढेपले यांच्या घरी झालेल्या चोरीचा तपास दिंडोरी पोलिसांनी १५ दिवसांच्या आत लावला आहे. या कारवाईमुळे पंचक्रोशीत चोऱ्या करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला आहे.

दिंडोरी घरफोडीचा पोलीसांनी १५ दिवसात लावला छडा

गेल्या काही दिवसांपासून दिंडोरी तालुक्यात स्थानिक टेहळणी करून चोरटे चोर्‍या, घरफोड्या,ा शेतातील वस्त्यावर बंद घरे फोडण्याचे काम रत होते. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी तपास लावत या चोरट्यांना जेरबंदे केले आहे. या चोरट्यांनी सातपूर, ओझर, मोहाडी, दिंडोरी या ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

हेही वाचा -हे राम..! नाशिक मनपाच्या शाळेत आसाराम बापुंच्या विचारांचे धडे

या कामगिरीची दखल घेऊन सर्व परिसरातील जनतेकडून पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. भविष्यात कोणताच गुन्हेगार या भागातील कुठेही चोरी करणार नाही अशी अद्दल गुन्हेगारांना घडावी याकरता पोलिसांसोबत युवक, जनता, पोलीस मित्रही रात्री रांऊडसाठी सज्ज झाले आहेत. या कामगिरीबद्दल दिंडोरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक अनिल कुमार बोरसे, पी.एस.आय. नवले, ए.पी.आय. अरुण आव्हाड, दिलीप पगार, जाधव आणि सर्व पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

हेही वाचा -सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या दोन चोरट्यांना नाशिक पोलिसांनी केले जेरबंद

ABOUT THE AUTHOR

...view details