नाशिकPM Modi Nasik Visit- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी नॅशनल युथ फेस्टिव्हलमध्ये युवकांना संबोधित केले. पंतप्रधान मोदी म्हणाले," आज मी नाशिकमध्ये आहे, हे मी माझे सौभाग्य मानतो. या धरतीनं टिळक सावरकरांना घडविलं. काळाराम मंदिरात सफाई करण्याचं भाग्य मिळालं, हे माझं सौभाग्य आहे. यावेळी अयोध्येत 22 जानेवारी रोजी होत असलेल्या श्री राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त देशातील नागरिकांनी आपआपल्या परिसरातील मंदिराची स्वच्छता करावी असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. राजमाता जिजाऊंना कोटी कोटी प्रणाम म्हणत पंतप्रधान मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली.
आज योगायोगनं राष्ट्रीय युवा दिनही आहे. त्यानिमित्तानं यावेळी तरुणांना पंतप्रधान मोदींनी काही मोलाचे सल्ले दिले. त्यामध्ये मोदींनी लोकल उत्पादनाला प्रोत्साहित करण्याचं आवाहन केलं. नशा ही जीवनाचा नाश करते त्यामुळे नशेपासून दूर राहण्याचा सल्ला मोदींनी दिला. विशेष म्हणजे तरुणांनी जीवनातून शिव्यांना हद्दपार करण्यांच आवाहन मोदींनी केलं. आई, मुलगी, बहीण यांच्या नावाने शिव्या देणं तरुणांनी बंद करावं असं ते म्हणाले. नाशिकमध्ये युवा महोत्सवामध्ये बोलताना मोदी पुढे म्हणाले की, आजही आपण क्रांतीकारकांची आठवण काढतो. त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करुन ठेवलं होतं. समाजाचं सशक्तीकरण करायचं असल्यास शिक्षणाला पर्याय नाही. त्यामुळे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची कास धरण्यास समाजाला शिकवलं.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात जावून भगवान श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले.यावेळी प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते काळाराम मंदिरात विधीवत पूजा व आरती करण्यात आली. काळाराम मंदिर संस्थानचे मुख्य महंत तसंच विश्वस्त यांच्यातर्फे पंतप्रधान मोदी यांचा भगवान श्रीरामाची चांदीची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. काळाराम मंदिराचे मुख्य महंत आचार्य महामंडलेश्वर सुधीरदास महाराज, श्री काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त धनंजय पुजारी, मंगेश पुजारी, नरेश पुजारी, मंदार जानोरकर, एकनाथ कुलकर्णी, पं. प्रणव पुजारी, अद्वय पुजारी तसंच वारकरी आणि संत परिवारातील मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समोर अभंग आणि भावार्थ रामायणातील 8 व्या अध्यायाचे (श्लोकांचे) ज्यामध्ये प्रभू श्रीराम यांचा नाशिकमधील वास्तव्याचा उल्लेख आहे, त्याचे वाचन करण्यात आले. यावेळी मंदिर परिसरात उपस्थित महंत, वारकरी आणि संत कुटुंबातील वंशज यांच्याशी मोदींनी संवाद साधला. मंदिर परिसरात असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास नरेंद्र मोदी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
हे वाचलंत का...
- सक्रिय राजकारणात सहभागी व्हा, घराणेशाही संपवा-पंतप्रधान मोदींच युवकांना आवाहन
- राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी करणार 11 दिवसांचा खास उपवास; ऑडिओ शेअर करत देशवासियांना दिला 'हा' संदेश
- महाराष्ट्र दौऱ्यावर पंतप्रधान मोदी; काळाराम मंदिरात टाळ वाजवून केलं भजन