नाशिक - उत्तर महाराष्ट्रातील पर्यटन विकासाच्या संधी लक्षात घेवून याभागात 'इको टुरिझम'साठी सुक्ष्म नियोजनासोबतच शिर्डी, तोरणमाळ, सारंगखेडा या स्थळांच्या विकासासाठी विशेष लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने उत्तर महाराष्ट्राचा पर्यटन आराखडा तयार करावा. नाशिक जिल्ह्याला 151 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने पूर्वनियोजित कार्यक्रम राबविण्याच्या सूचना रविवारी (दि. 3 जाने.) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
बोट क्लब पुन्हा सुरू करा
आज (रविवार) नाशिक येथे एमटीडीसीच्या ग्रेप सिटी रिसॉर्ट येथे उत्तर महाराष्ट्र व नाशिक जिल्ह्यातील पर्यटन विषयक झालेल्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. नाशिक बोट क्लब सुरू झाला ही उत्तर महाराष्ट्राच्या पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्वाचा टप्पा असून बोटींबाबत विशेष दक्षता घ्या. सारंगखेडा येथे नेलेल्या बोटी पुन्हा आणल्या आहेत. त्या आता नियमित कार्यान्वित ठेवण्याबरोबरच बोट क्लबवर सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे, त्यादृष्टीने कार्यवाही करावी. कोरोनामुळे नागरिक वैतागली आहेत, त्यांना विरंगुळा म्हणून बोट क्लबचा आनंद घेवू द्या. त्यासाठी तेथे सोयी सुविधा पूर्ण करा, असा सूचना यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी निसर्गरम्य वातावरण ठेवा