महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे'

नागरिकांना माझी विनंती आहे, की प्रशासनाने ज्या सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनांचे तंतोतंत पालन करा. प्रशासन आपल्या जिवाचे रक्षण करण्यासाठीच आपल्याला सूचना देत आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.

corona nashik
पालकमंत्री छगन भूजबळ

By

Published : Apr 12, 2020, 8:49 PM IST

नाशिक- जिल्ह्यात रुग्णांची संख्या ३२वर गेली असून विशेषतः मालेगाव शहरात २८ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मात्र, मालेगावमधील नागरिकांनी घाबरून न जाता लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया देताना पालकमंत्री छगन भूजबळ

मालेगाव शहरात २८ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. हे सर्वजण यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह असेलेल्या रुग्णांच्या संपर्कातीलच आहेत. त्यातील एका रुग्णाचा यापूर्वी मृत्यू झाला असून २७ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवलेले आहेत. त्यांचे विलगीकरण करण्यात आलेले आहे. या रुग्णांच्या संपर्कातील १६० व्यक्ती विलगीकरण प्रक्रियेखाली असल्याने मालेगाव शहरवासियांनी घाबरून जावू नये, मात्र परिस्थितीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे, असे छगन भुजबळ यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

तसेच, नागरिकांनी आपापल्या घरी राहून रस्त्यावर कुठेही गर्दी करू नये. प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना दिल्या जात असताना मालेगावमधील नागरिकांनी सरकारच्या सूचनांचे पालन न केल्यामुळे या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की, प्रशासनाने ज्या सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनांचे तंतोतंत पालन करा. प्रशासन आपल्या जिवाचे रक्षण करण्यासाठीच आपल्याला सूचना देत आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.

हेही वाचा-शेतात अर्धा किलोमीटर परिसरात सापडलेल्या चुरगळलेल्या नोटा!

ABOUT THE AUTHOR

...view details