मनमाड : मनमाड शहरातील कोरोना परिस्थिती सध्या आटोक्यात असली तरी, येथील लोकसंख्या बघता येथे लसीकरण वाढवण्याची गरज व्यक्त होत आहे. शहराची लोकसंख्या जवळपास सव्वा ते दीड लाख आहे. मात्र येथे एक दिवसाआड 100 लस देण्यात येत आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. याकडे शासनाने लक्ष देऊन केंद्र वाढवण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी होताना दिसत आहे.
मनमाडला लसीकरण वाढवण्याची नागरिकांची मागणी
शहराची लोकसंख्या जवळपास सव्वा ते दीड लाख आहे. मात्र येथे एक दिवसाआड 100 लस देण्यात येत आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. याकडे शासनाने लक्ष देऊन केंद्र वाढवण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी होताना दिसत आहे.
डिसीएचसी सेंटर सज्ज, मात्र ऑक्सिजन पुरवठा गरजेचा
शहरात सध्या 2 कोव्हिड सेंटर सुरू आहेत. येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये 30 खाटा व उपजिल्हा रुग्णालयात 30 खाटा असे कून 60 खाटांचे ऑक्सिजनयुक्त डिसीएचसी सेंटर तयार आहे. मात्र येथे मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याचीही गरज व्यक्त केली जात आहे. ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न व्हावे अशी मागणी जनतेकडून होत आहे.
तालुक्याला वाली उरला नाही
नांदगांव तालुक्यातील जनतेला सध्या कोणी वाली उरला नाही की काय असा सवाल सामान्य जनतेकडून विचारला जात आहे. 45 दिवसांत जवळपास 202 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यु झाला असुन राजकीय नेते भूमिगत झाले आहेत असा आरोप करत तालुक्याला वाली नसल्याची टीका जनतेतून होताना दिसत आहे.