महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इगतपुरी तालुक्यातील नागरिकांकडून समीर भुजबळांना लोकनिधी, तालुका समस्यामुक्त करण्याचे भुजबळांचे आश्वासन - loksabha

इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव आणि मोडाळे या गावातील नागरिकांनी भुजबळांचे उत्स्फुर्त स्वागत केले. निवडणूक खर्चासाठी येथील तरुणांनी भुजबळांना ४२ हजारांची रोख रक्कम दिली. यावेळी महिलावर्गात विशेष उत्साह दिसून आला. समीर भुजबळ यांनी गावातील सर्व स्तरातील नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला.

इगतपुरीतील नागरिक समीर भुजबळांना निधी देताना

By

Published : Apr 1, 2019, 11:06 AM IST

नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक मतदारसंघाचे उमेदवार समीर भुजबळ यांनी इगतपुरी तालुक्यातील लोकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. तसेच, त्यांना ४२ हजारांची रक्कम निवडणूक निधी म्हणून दिला. निवडून आलो तर इगतपुरी समस्यामुक्त करू, असे आश्वासन यावेळी समीर भुजबळांनी दिले.

इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव आणि मोडाळे या गावातील नागरिकांनी भुजबळांचे उत्स्फुर्त स्वागत केले. निवडणूक खर्चासाठी येथील तरुणांनी भुजबळांना ४२ हजारांची रोख रक्कम दिली. यावेळी महिलावर्गात विशेष उत्साह दिसून आला. समीर भुजबळ यांनी गावातील सर्व स्तरातील नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला.

समीर भुजबळांनी इगतपुरी तालुक्यातील मोडाळे, शिरसाटे, कुशेगाव, सांजेगाव, आहुर्ली, शेवगेडांग, म्हसुर्ली, ओंडली, नागोसली, धारगाव, वैतरणा, आवळी दुमला, कऱ्हाळे, रायंबे, कावनई या गावांचा दौरा केला. यावेळी ग्रामस्थांनी अनेक समस्यांचा पाढा वाचला. भुजबळ यांनी सगळ्याचे मत जाणून घेत उत्तरे देण्याचा प्रयत्न केला.

भुजबळ म्हणाले, की विद्यमान खासदाराने तालुक्यात कोणतीही ठोस योजना आणली नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील त्यांना सोडविण्यात आला नाही. सरकारच्या शेतीविषयक धोरणांमुळे शेतकरी त्रस्त आहेत. तरुण बेरोजगार आहेत. मी निवडून आलो तर संपूर्ण इगतपुरी तालुका समस्यामुक्त करू, असे भुजबळ म्हणाले.

यावेळी भुजबळांसोबत निर्मला बोंबले, अनिल गोरे, संदिप बोंबले, विकास शेंडगे, हरीभाऊ गोरे, संतोष बोडके, कल्पना बोंबले, राहुल बोंबले, नामदेव आहेर, भिका मेदडे, गजराम शिंदे, सुरेश कालेकर, कचरू मेदडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details