नाशिक - गडचिरोलीतील जांबुरखेडा गावात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात सी ६० पथकाच्या १५ जवानांना वीरमरण आले. या वीरजवानांना मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती व छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने आदरांजली वाहण्यात आली. जुने नाशिक भागातील चौक मंडळी परिसरात नागरिकांनी एकत्र येत मेणबत्ती लावून जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
नाशिक : नक्षलवादी हल्ल्यात वीरमरण प्राप्त जवानांना श्रद्धांजली - pays
वीरजवानांना मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती व छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने आदरांजली वाहण्यात आली. जुने नाशिक भागातील चौक मंडळी परिसरात नागरिकांनी एकत्र येत मेणबत्ती लावून जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
नाशिक : नक्षलवादी हल्ल्यात वीरमरण प्राप्त जवानांना श्रद्धांजली
देशात आतंकवादी आणि नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या हल्ल्यात जवानांचा हकनाक बळी जात आहे. मात्र वारंवार होणारे हल्ले रोखण्यात भाजप सरकार अपयशी होत असून त्यांनी सरकारमधून पाय उतार व्हावे, अशी प्रतिक्रिया छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे प्रदेशध्यक्ष अजीम पठाण यांनी दिली.
यावेळी मुक्तार शेख, रफिक साबीर, अखिल खान, जावेद मुंशी, फरीद शेख, तनवीर शेख, मुन्ना शेख, वसीम पिरजादे, निसार शेख, मोहसीन शहा, नादिर पठाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.