नाशिक - कोलकाता येथील एन.आर.एस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे डॉ.परिभा मुखर्जी या तरुण डॉक्टरवर पेशंटच्या नातेवाईकांनी जीवघेणा हल्ला केला होता. सध्या ते डॉक्टर अत्यवस्थ स्थितीत असून त्यांची मृत्युशी झुंज सुरू आहे. या प्रकरणानंतर देशभरातील डॉक्टरांनी आणि संघटनांनी निषेध नोंदवला होता. त्याचप्रमाणे नाशिकमधील आय.एम.ए. डॉक्टरांच्या संघटनेने देखील या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
कोलकातामधील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध; नाशकातील डॉक्टर संपात सहभागी - death
कोलकत्ता येथील वैद्यकीय एन आर एस वैधकीय महाविद्यालयात हॉस्पिटल येथे डॉ.परिभा मुखर्जी या तरुण डॉक्टर वर पेशंटच्या नातेवाईकांकडून जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी नाशिकमधील आय.एम ए या डाँ.संघटनेनी निशेध केला.
दिवसेंदिवस वैद्यकीय व्यवसायिक आणि रुग्णालयांवरील हिंसाचार वाढताना दिसत आहे. आय.एम.ए. या संघटनेने वेळोवेळी यावर आवाज उठवला आहे. यावेळी देखील देशभरातील सर्व डॉक्टर काळ्या फिती लावून काम करीत या घटनेचा निषेध केला. तसेच जागोजागी धरणे, प्रदर्शने अशा प्रकारची आंदोलनेही करण्यात येत आहेत.
सोबतच आज सकाळी सहा पासून त्यांनी 24 तासाचा संप पुकारला आहे. दवाखान्यातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवा बंद राहणार आहेत. नाशिक येथील सर्व 1600 सभासदांचे दवाखाने आणि सुमारे 400 रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग आज बंद असल्याची माहिती आय.एम.ए. चे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत देवरे यांनी दिली.
केंद्र शासनाने सर्व प्रकारच्या आरोग्य संस्थांवर होणारे हिंसाचार रोखण्यासाठी तातडीने एक केंद्रीय कायदा करून आरोग्य संस्थांचे रक्षण करावे. अशी मागणी नाशिकमधील आय.एम ए या डाॅ. संघटनेनी यावेळी केली.