नाशिक - अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अंडरवर्ल्ड ड्रग्ज माफियांशी संबधांचा आरोप केला होता. या प्रकरणी भाजप नेत्या पंकजा मुंडेंना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अरे बापरे! ते असे बोलले मला माहित नाही. हे तर हस्यास्पद आहे, असे सांगत फडणवीसांवर असललेले आरोप चुकीचे असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे नाशिकच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आल्या आहेत. त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमीपुजन आणि उद्घाटन झाले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, की जे राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री होते त्यांच्याबाबत असे आरोप करणे हास्यास्पद आहे. फडणवीस यांनी राज्यात मोठे काम उभे केले.
हेही वाचा-नवाब मलिक यांचा राजीनामा घ्या - प्रवीण दरेकर
संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नाही...
भाजप नेते प्रमोद महाजन आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या बरोबर राहिल्याने आणि त्यांचे संस्कार मिळाल्याने मी 35 ते 40 मिनिटे भाषण करू शकते. परंतु आता काही जणांना या विषयी वाईट वाटते. मी आणि मंत्री छगन भुजबळ अशा वर्गातून येतो की त्या वर्गात संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नाही. त्यामुळे आम्ही संघर्ष करतो. आम्हाला आमच्या समाजातील वर्गासाठी जे येईल ते खेचून आणतो, असे मुंडे यानी यावेळी सांगितले आहे.