नाशिक - रोलेट या ऑनलाइन जुगाराने एका शेतकऱ्यांचा बळी घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात वर्षभरापूर्वी घडलेल्या या घटनेस वाचा फुटली असून, याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
एका संशयीतास बेड्या, पाच साथीदार फरार -
त्र्यंबकेश्वर तालुक्यात वर्षभरापूर्वी घडलेल्या या घटनेस वाचा फुटली असून याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या संशयिताचे पाच साथीदार अद्याप फरार आहेत. जोगेंद्र शहा, असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव असून रमेश चौरसिया, आंचल चौरसिया, कैलास प्रसाद शहा, सुरेश वाघ, शांताराम पगार हे पाचही संशयित आरोपी अद्याप फरार आहेत.
वर्षभरानंतर आला प्रकार उघडकीस -
त्र्यंबकेश्वर रोडवरील बेझे फाटा परिसरात जून २०१९ मध्ये नामदेव रामभाऊ चव्हाण या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले होते. याप्रकरणी चव्हाण यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू झाल्यानंतर पोलीस तपासात चव्हाण यांच्यावर ऑनलाइन गेम खेळल्यामुळे कर्ज होते व ते परत मागण्यासाठी काही नागरिक त्यांच्यामागे तगादा लावत होते. पैसे परत करण्यासाठी त्याने शेत जमीन विकून काही पैसे परत केले. परंतु काही पैसे बाकी असल्याने अनेकजण त्यांच्याकडे तगादा लावत होते. या सर्व त्रासाला कंटाळून चव्हाण यांनी आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा - बॉलिवूडची 'क्वीन' कंगना आता इंदिरा गांधींच्या भूमिकेत?