नाशिक -दिंडोरी तालुक्यात उन्हाळी कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. परंतु यावर्षी कोरोना व्हायरसमुळे कांद्याला बाहेरील देशात मागणी नसल्यामुळे कांदा कुठे साठवावा, असा प्रश्न कांदा उत्पादकांना पडला आहे.
बेमोसमी पावसामुळे कांदा उत्पादकांची धावाधाव - नाशिक पाऊस अपडेट्स
कांद्याला बाजार नसल्यामुळे कांदा शेतात राहू द्यावा तर पावसाचे संकट व बाजारात न्यावा तर खर्च निघत नसल्याचे संकट, अशा द्विधा अवस्थेत सध्या कांदा उत्पादक शेतकरी सापडला आहे.
बेमोसमी पावसामुळे कांदा उत्पादकांची धावाधाव
आज अचानक पावसाचे वातावरण तयार झाल्यामुळे विक्रीस तयार झालेल्या कांदा पावसापासून वाचवण्यासाठी शेतकरी वर्गात एकच धावाधाव झाली. कोरोनामुळे बाजारपेठांमध्ये ठराविकच वाहनांचा लिलाव होत असला तरी कांद्याला बाजार नसल्यामुळे कांदा शेतात राहू द्यावा तर पावसाचे संकट व बाजारात न्यावा तर खर्च निघत नसल्याचे संकट, अशा द्विधा अवस्थेत सध्या कांदा उत्पादक शेतकरी सापडला आहे.