महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लासलगाव; कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी शेतकऱ्यांचे 'शोले' स्टाईल आंदोलन - लासलगाव नाशिक

शेतकऱ्यांनी जलकुंभावर उभे राहून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. कांद्यावरील निर्यातबंदी उठवली नाही, तर त्यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केंद्र सरकारला दिला आहे.

farmers protest
शेतकऱ्यांचे आंदोलन

By

Published : Feb 7, 2020, 8:26 PM IST

Updated : Feb 7, 2020, 8:38 PM IST

नाशिक - केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे. मध्यंतरी कांद्याच्या भावाने शंभरी पार केल्याने कांदा भारतात रहावा यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केली होती. आता पुन्हा एकदा कांद्याचे भाव स्थिर झाल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवावी, या मागणीसाठी आज (शुक्रवार) लासलगाव येथील मार्केट कमिटीच्या जलकुंभावर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना, जय किसान फोरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी 'शोले स्टाईल' आंदोलन केले.

लासलगाव; कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी शेतकऱ्यांचे 'शोले' स्टाईल आंदोलन

हेही वाचा -येवल्यात कांद्याच्या ट्रॅक्टर खाली चिरडून तरुण मजूर ठार

यावेळी शेतकऱ्यांनी जलकुंभावर उभे राहून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. कांद्यावरील निर्यातबंदी उठवली नाही, तर त्यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केंद्र सरकारला दिला आहे. या आंदोलनानंतर शेतकऱ्यांनी निफाड तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

केंद्र सरकारने आंध्र प्रदेशमधील शेतकऱ्यांना 10 हजार मेट्रिक टन कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा संताप झाला असून, महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कुठला गुन्हा केला आहे, असे म्हणत तात्काळ कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असे शेतकरी संघटनेने म्हटले आहे.

Last Updated : Feb 7, 2020, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details