नाशिक - राजस्थान आणि मध्यप्रदेशमधील तप्त उन्हामुळे तेथील कांदा खराब झाला आहे. त्यामुळे नाशिकच्या कांद्याला मागणी वाढली आहे. त्याचबरोबर कांद्याचे भाव वाढले असून, ते ८५० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
नाशिकच्या कांद्याला मागणी वाढली, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा - market
पण, यावर्षी कांद्याला ८५० रुपये प्रती क्विंटल भाव आले आहेत. त्यामुळे शेतकऱयांसाठी ही आनंदाची बाब आहे. कांदा व्यापारी राजू मोराडे म्हणाले, की यावर्षी कांद्याला पोषक वातावरण होते. त्यामुळे कांद्याचे उत्पादन चांगले झाले आहे.
मागील वर्षी कांद्याला ४०० ते ५०० रुपये क्विंटल भाव होता. शेतकऱ्याला अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकऱ्यांनी कांदा विकला नाही. दरवाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. पण, वाढ झाली नाही. त्यामुळे शेतकऱयांना कवडीमोल भावात कांदा विकावा लागला. त्यामुळे मागचे वर्ष कांदा उत्पादकांसाठी डोळ्यात आसवे आणणारे ठरले.
पण, यावर्षी कांद्याला ८५० रुपये प्रती क्विंटल भाव आले आहेत. त्यामुळे शेतकऱयांसाठी ही आनंदाची बाब आहे. कांदा व्यापारी राजू मोराडे म्हणाले, की यावर्षी कांद्याला पोषक वातावरण होते. त्यामुळे कांद्याचे उत्पादन चांगले झाले आहे. नाशिकचा कांदा चवीला चांगला असतो. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रतून त्याला मागणी असते. त्याचबरोबर इतर प्रांत आणि विदेशता देखील या कांद्याला मागणी असते. उन्हाळ्यात कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात होत असते.