नाशिक - 'जागतिक महिला दिना'निमित्त स्त्री शक्तीचा संदेश देत सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारे फलक घेऊन नाशिकमध्ये महिलांची दुचाकी रॅली निघाली. तब्बल दोन हजार महिलांनी उस्फुर्त सहभाग नोंदवत महिला सुरक्षा, महिला सबलीकरणावर आपली मते मांडली.
नाशिकमध्ये 'स्त्री' शक्तीचा जागर; महिला दिनानिमित्त दुचाकी रॅलीचे आयोजन - womens day
स्त्री शक्तीचा गौरव करण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षी वॉव ग्रुपच्यावतीने महिला दुचाकी रॅली शहरातून काढण्यात येते. यंदाच्या वर्षाचे 'नो हॅकिंग रॅली'ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
हेही वाचा -महिला दिन विशेष: गॅरेज व्यवसायात तिनं निर्माण केलं स्वत:चं अस्तित्व....
बांधणीची साडी, भरजरी पैठणी, दागदागिने, भगवे फेटे, सलवार कुर्ता, जीन्स अशा विविधरंगी पेहरावात महिलांनी दुचाकी रॅली काढली होती. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांइतकेच धडाडीने काम करणाऱ्या स्त्री शक्तीचा गौरव करण्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षी वॉव ग्रुपच्यावतीने महिला दुचाकी रॅली शहरातून काढण्यात येते. यंदाच्या वर्षाचे 'नो हॅकिंग रॅली'ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या रॅलीला पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी झेंडा दाखवत सुरुवात केली.
वॉव लाल बिंदू बॅग स्टॉलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महिलांनी लाल बिंदू बॅग खरेदी केल्या. वापरलेले सॅनिटरी नॅपकीनची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी जनजागृती या स्टॉलच्या माध्यमातून करण्यात आली. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्वयंसेवकांचा यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात सुरेखा खैरनार, मीरा देवरे, सारिका उन्हवणे, अंजना पवार, सरला आहिरे, सुंदराबाई कुमावत, मनिषा वाघ, शैला फडके, निर्मला नाठे, भिमाबाई खांडवी, साधना वाजे, सुवर्णा सकाळे, सिंधुबाई थोरात यांच्या कार्याचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.