महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिलासादायक..! नाशिक जिल्ह्यातील 168 गावे राहिली कोरोनामुक्त - nashik covid news

नाशिक जिल्ह्यात मार्च 2020 पासून कोरोना उद्रेक झाल्यापासून जिल्ह्यातील 1 हजार 926 गावांपैकी 168 गावांमध्ये आतापर्यंत एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला नाही.

कोरोना
कोरोना

By

Published : Jun 8, 2021, 7:48 PM IST

नाशिक -जिल्ह्यात कोरोनाच्या दोन्ही लाटेत कोरोनाचा उद्रेक झाला. यात नाशिक जिल्ह्यातील लाखो नागरीकांना कोरोनाची लागण झाली, हजारो रूग्णांचा बळी गेला. मात्र, असे असतांना नाशिक जिल्ह्याच्या 15 तालुक्यातील 168 गाव अशी आहेत तिथे कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. या तालुक्यातील नांदगाव, देवळा आणि निफाड हे तालुके वगळता इतर बारा तालुक्यांपैकी किमान एक गाव आतापर्यंत कोरोनामुक्त राहिले आहे. यातील बहुतेक गावे दुर्गम किंवा आदिवासी भागात आहेत. तर काही गावांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता कमी करण्यासाठी गावपातळीवर उत्तम उपाय केले गेले आहेत. यात नमशिक जिल्ह्यात पेठ तालुक्यात सर्वाधिक 35 वागाचा समावेश आहे. प्रत्येक गावात लोकसंख्या सरासरी 3 हजार 500 इतकी असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी सांगितले आहे.

नागरिकांच्या कमी गरजा

आदिवासी भागात असल्याने रहिवासीयांच्या दैनंदिन गरजा फारच असतात. ते सहसा त्यांच्या स्वतःच्या संसाधनांमधून व्यवस्थापित करू शकतात. वैद्यकीय मदत वगळता ते इतरांवर अवलंबून नसतात. या सर्व खेड्यांमध्ये लसीकरण पूर्ण करण्याबाबत प्रशासन विचार करत असल्याचे डॉ. आहेर म्हणाले.

गावातील स्वच्छतेवर लक्ष

कोरोना आल्यापासून आम्ही दहा दिवसांत गावात जंतुनाशक फवारणी केली. काही स्वयंसेवी संस्थांनी ग्रामस्थांना साबण, तेल आणि इतर वस्तू देऊन मदत केली, अशी माहिती पेठ तालुक्यातील नागरिकांनी दिली. तसेच इतर भागात काम करून घरी आलेले सर्व रहिवासी कित्येक दिवसांपासून खेड्यातील लहान झोपड्यांमध्ये वेगळे ठेवण्यात आले होते. त्यांची तब्येत चांगले असल्याची खात्री करून घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी जाण्याची परवानगी देण्यात आली, अशी माहिती स्थनिक नागरिकांनी दिली.

गावात टाळेबंदी

आदिवासी बहुल कळवण तालुक्यातील नवी बेज गावचे सरपंच घनश्याम पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे गावातील आपल्या अनुभवाविषयी मुख्यमंत्री ठाकरे यांना सांगितले. पवार म्हणाले, मार्च, 2021 मध्ये जेव्हा गावात 74 कोरोनाग्रस्त आढळून आले होते. तेव्हा आम्ही टाळेबंदीचा निर्णय घेतला. गावात बाहेरून परत आल्यावर नागरीकांना शाळेत अलग ठेवण्यात आले होते. नोकरीसाठी गावाबाहेर ये-जा करणाऱ्यांची चाचणी सुरू केली.

हेही वाचा -नाशिकमध्ये सावत्र आईने मतीमंद मुलाला दिले चटके

ABOUT THE AUTHOR

...view details