नाशिक -इगतपुरी तालुक्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी मज्जाव करत घरचा रस्ता दाखवला आहे. कोरोनामुळे पर्यटन स्थळावर होणारी गर्दी टाळण्यासाठी शासनाने पर्यटन स्थळे अद्याप बंद ठेवली आहेत. त्यामुळे इगतपुरी पोलीस रस्त्यात नाकेबंदी करून पर्यटकांना अडवून परत पाठवत आहेत.
पर्यटकांवर होणार कारवाई
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात दरवर्षी पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र, यंदा कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वच पर्यटन स्थळे बंद आहेत. आता महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने काही ठिकाणी लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. महाराष्ट्राची चेरापुंजी असलेल्या इगतपुरी तालुक्यामध्ये दरवर्षी अशोका धबधबा, भावली धरण क्षेत्रात पर्यटकांची झुंबड उडालेली पाहायला मिळते. तर यंदा लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पर्यटकांची पावले इगतपुरीकडे वळू लागली आहेत. नाशिकसह इतरत जिल्ह्यातूनही अनेक पर्यटक इगतपुरीला येत असतात. परंतु इगतपुरी तालुक्यातील पोलीस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून परिसरामध्ये जमावबंदी लागू केली आहे. कोणत्याही प्रकारे बाहेरील वाहनांनी गर्दी करू नये. तसेच पर्यटकांची गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी भावली धरण प्रवेशद्वारावर मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे. धरण परिसरात पर्यटक आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाच्या वतीने देखील देण्यात आले आहेत.
मुंबईतील कुटुंबाला घरात राहण्याचा आला कंटाळा -