महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशकात कोरोनाचा कहर; 24 तासात जिल्ह्यात 574 नवे कोरोनाबाधित - five hundred seventy four people corona positive in nashik news

जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 739 जणांना कोरोनाची लागण झाली असून, यात सर्वाधिक 5271 रुग्ण एकट्या नाशिक शहरातील आहे. तर मालेगावातील1181, नाशिक ग्रामीण 2101 समावेश आहे. आता पर्यंत जिल्ह्यात 371 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, यात दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 5723 जण कोरोनामुक्त झाले आहे.

corona positive in nashik
नाशकात कोरोनाचा कहर

By

Published : Jul 18, 2020, 8:52 AM IST

नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत असून दिनांक 17 जुलैला 24 तासात नाशिक जिल्ह्यात तब्बल 574 नवे बाधित रुग्ण आढळून आले. यात नाशिक शहरातील सर्वाधिक 366 जणांचा समावेश आहे. 24 तासात एवढे रुग्ण आढळून आल्याचा आतापर्यंतचा हा उच्चांकी आकडा आहे. नाशिक शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून मागील 24 तासात सहा जणांचा मृत्यू झाला असून या नाशिक ग्रामीण मधील तीन, मालेगाव, नाशिक आणि जिल्हा बाह्य एका जणाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 739 जणांना कोरोनाची लागण झाली असून, यात सर्वाधिक 5271 रुग्ण एकट्या नाशिक शहरातील आहे. तर मालेगावातील1181, नाशिक ग्रामीण 2101 समावेश आहे. आता पर्यंत जिल्ह्यात 371 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, यात दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 5723 जण कोरोनामुक्त झाले आहे.

मृतांची संख्या

नाशिक ग्रामीण - 82
नाशिक मनपा - 194
मालेगाव मनपा - 80
जिल्हा बाह्य - 15
एकूण नाशिक जिल्ह्यात - 371

नाशिक जिल्ह्याची आतापर्यंतची परिस्थिती

नाशिक जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्ण - 8739
कोरोनामुक्त - 5723
एकूण मृत्यू - 365
एकूण उपचार घेत असलेले रुग्ण - 4443

ABOUT THE AUTHOR

...view details