नाशिक- तरुणीची छेडछाड केल्याप्रकरणी नेपाळी वॉचमनला सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याआधी देखील वॉचमन लालबहादूर याने अनेकदा या तरुणीची छेडछाड केल्याचे तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
नाशकात नेपाळी वॉचमनकडून तरुणीची छेडछाड; आरोपी अटकेत - TEMPERING
लालबहादूर असे या वॉचमनचे नाव असून त्याने अनेकदा या तरुणीची छेडछाड केल्याचे तरुणीने म्हटले आहे.
नाशिकच्या पंडित कॉलनी येथील लक्ष्मीनारायण बिल्डींगमध्ये लालबहादूर हा वॉचमन म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून काम करतो. याच बिल्डिंगमध्ये राहणारी पीडित तरुणी ही वाचनालयात जाण्यासाठी घरातून बाहेर पडली असताना अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लालबहादूर याने तिचा हात पकडून लज्जास्पद कृत्य केले. याबाबत तरुणीने घरच्यांना हा प्रकार सांगितला, त्यानंतर घरच्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात वॉचमन लालबहादूर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून, सरकारवाडा पोलिसांनी लालबहादूर यास तरुणीच्या छेडछाड प्रकरणी अटक केली आहे. याआधी देखील या वॉचमनने तरुणीची छेड काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे.