महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या संकटात फडणवीस अन् भाजपाने राजकारण करू नये - शरद पवार

पवार आज नाशिक दौऱ्यावर होते. त्यांनी दुपारच्या सत्रात नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भातील बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे, कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. यावेळी पवारांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. शहरामध्ये रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खाटा उपलब्ध करून देणे तसेच जास्तीत जास्त चाचण्या करणे महत्त्वाचे असल्याचे पवारांनी सांगितले.

sharad pawar nashik visit  sharad pawar nashik meeting  sharad pawar on fadnavis in nashik  sharad pawar criticized BJP in nashik  फडणीसांबाबत शरद पवार नाशिक  शरद पवार नाशिक बैठक  शरद पवार नाशिक दौरा
शरद पवार

By

Published : Jul 24, 2020, 6:36 PM IST

नाशिक -कोरोनाच्या संकट काळात फडणवीस आणि भाजपाने राजकारण करू नये, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. नाशिक दौऱ्यावर आले असताना अधिकाऱ्यांच्या बैठकी नंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्णपणे कोरोनाच्या कामाला वाहून घेतल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.

कोरोनाच्या संकटात फडणवीस अन् भाजपाने राजकारण करू नये - शरद पवार

पवार आज नाशिक दौऱ्यावर होते. त्यांनी दुपारच्या सत्रात नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भातील बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे, कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. यावेळी पवारांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. शहरामध्ये रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खाटा उपलब्ध करून देणे तसेच जास्तीत जास्त चाचण्या करणे महत्त्वाचे असल्याचे पवारांनी सांगितले. आम्ही फिल्डवर जाऊन परिस्थिती बघून त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देणार आहोत आणि त्यानंतर धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री घेत आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नाशिकमध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ असल्याने डॉक्टर्सची कमतरता भासणार नाही. मात्र, डॉक्टर्स टाळाटाळ करत असतील तर मात्र आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाईचा इशारा देखील त्यांनी दिला.

दरम्यान लॉकडाऊनबाबत माझी काहीही भूमिका नाही. मात्र, आरोग्याप्रमाणे आर्थिक संकट मोठे आहे. कामगार त्यांच्या राज्यात गेला आहे. मात्र, तो परतण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे परिस्थिती सामान्य करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील जनतेच आम्ही देणं लागतो. फडणवीसांनी देखील या कामात लक्ष घालावे आणि राजकारण करू नये, असा टोला देखील शरद पवारांनी यावेळी लगावला. तसेच आतापर्यंत दाखवला तसाच संयम मुस्लिम बांधवांनी बकरी ईदला दाखवावा, असे आवाहन देखील पवारांनी केले आहे.

नाशकात सध्या लॉकडाऊनची गरज नाही - राजेश टोपे
साखळी ब्रेक करण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय आहे. मात्र, नाशिकमध्ये 15 ते 21 ऑगस्टपर्यंत उपलब्धता भरपूर आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय पालकमंत्र्यांवर सोपवलेला आहे. नाशिकमध्ये लगेच लॉकडाऊनची गरज नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. दरम्यान रेमडिसिव्हरच्या सगळ्या ऑर्डर तीन कंपन्यांना देण्यात आल्या असून जिल्हाधिकाऱ्यांनी हे औषध मागवायला अडचण नाही, असेही टोपे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details