नाशिक - शरद पवार यांच्या समर्थनार्थ निफाड तहसील कार्यालयावर घोषणाबाजी कल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता सुरू असून या काळात पक्षाकडून सरकारी कार्यलयावर आंदोलन करण्यास मनाई आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर राज्य सहकारी बँकेत झालेल्या आर्थिक गैरव्यवहारा प्रकरणी सक्तवसुली संचनालयाने गुन्हा दाखल केला. याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारले. नाशिकच्या निफाड तहसीलदार कार्यालयाबाहेर देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून तहसीलदारांना निवेदन दिले.