महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'फडणवीसांना तेल लावून आखाड्यात उतरवले तर कसा दिसेल पैलवान याचा विचारच नको' - अमोट मि्टकरी भाषण नांदगाव

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पैलवानबद्दलच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यावर टीका केली. तसेच जर का फडणवीस यांना तेल लावून आखाड्यात उतरवले तर कसा दिसेल याचा विचार नको करायला, अशी टीका मिटकरी यांनी केली.

अमोल मिटकरी यांचे भाषण

By

Published : Oct 17, 2019, 11:33 AM IST

मनमाड- शिवसेनेचा वचननामा म्हणजे नुसती धुळफेक आहे. 10 रुपयांत थाळी देतो म्हणाले पण, नुसती थाळीच त्यात जेवण नाही. तसेच कर्जमाफी शब्द मान्य नाही कर्जमुक्ती हवी आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी नांदगाव येथील सभेत व्यक्त केले. तसेच फडणवीस यांच्या पैलवानाच्या वक्तव्याचाही मिटकरी यांनी समाचार घेतला.

अमोल मिटकरी यांचे भाषण

हेही वाचा - हर्षवर्धन जाधवांच्या घरावर हल्ला; अज्ञातांनी केली दगडफेक

नांदगांव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पंकज भुजबळ यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मिटकरी बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पैलवानबद्दलच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यावर टीका केली. तसेच जर का फडणवीस यांना तेल लावून आखाड्यात उतरवले तर कसा दिसेल याचा विचार नको करायला, अशी टीका मिटकरी यांनी केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंकज भुजबळ यांनी अनेकदा विधानसभेत तालुक्यातील प्रश्न मांडले आहेत. त्यांना मी कित्येकदा सांगितले की, याला प्रसिद्धी द्या मात्र, त्यांनी कधीच दिली नाही. असा हा भोळा माणूस आहे. त्याला पुन्हा संधी द्या, असे आव्हान केले.

हेही वाचा - विधानसभा २०१९ : आज पुणे साताऱ्यासह परळीत पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभा

यावेळी छगन भुजबळ, माजी आमदार संजय पवार यांचेही भाषण झाले. त्यांनी देखील विरोधकांवर घणाघाती टीका केली. यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार येणार असल्याचे स्वतः खडसे यांनी जाहीर केले. तसेच भाजपचे खासदार महाडिक यांनी देखील घड्याळाला मत द्या, असे जाहीर सभेत सांगितले असल्याचे यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details