नाशिक - श्रीनगर जवळ कर्तव्य बजावतांना नाशिकच्या आडगाव भागात राहणारे लष्करी जवान आप्पा मधुकर मते यांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. ते श्रीनगर पासून ७० किलोमीटर अंतरावर बंदोबस्ता साठी तैनात होते. ऑक्सिजन कमी पडल्याने त्यांचा ७ जानेवारीला रात्री मृत्यू झाला. या घटनेमुळे आडगाव परिसरात शोककळा पसरली आहे. लष्करी कायद्यानुसार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री किंवा उद्या त्यांचे पार्थिव नाशिकला आणले जाणार असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.
श्रीनगर जवळ कर्तव्य बजावताना नाशिकच्या लष्करी जवानाचा हृदयविकाराने मृत्यू
श्रीनगर जवळ कर्तव्य बजावताना नाशिकच्या आडगाव भागात राहणारे लष्करी जावान आप्पा मधुकर मते यांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. ते श्रीनगर पासून ७० किलोमीटर अंतरावर बंदोबस्तासाठी तैनात होते.
लष्करी जवान आप्पा मते हे अल्पभूधारक शेतकरी असून, त्यांच्या आई -वडील यांनी मोठ्या कष्टाने त्यांचे शिक्षण केले आहे. ते 2006 मध्ये लष्करात भरती झाले होते. मागील वर्षी त्यांचा बॉण्ड संपल्यानंतर त्यांनी पुढील चार वर्षाचा बॉण्ड बनवून घेतला होता. मागील वर्षात सेवानिवृत्त न होता त्यांनी देशप्रेमासाठी बॉण्ड वाढवून घेतल्याचे नातेवाईक मित्र सांगतात.
जम्मू-काश्मीरमध्ये बदललेल्या वातावरणामुळे कायम दक्ष असलेल्या सैन्याच्या तैनात जवानांमध्ये ते कार्यरत होते. त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने आडगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, अकरा वर्षाचा मुलगा, भाऊ असा परिवार आहे.