नाशिक - देशातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये हाणामारीचा प्रकार समोर आला आहे. नारायण नागबळी विधीच्या वादावरून त्र्यंबकेश्वरमधील पुजारी आणि परप्रांतीय पुजाऱ्यामध्ये शिवीगाळ आणि हाणामारीची घटना घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून, हा वाद आता पोलीस ठाण्यापर्यँत पोहचला आहे.
त्र्यंबकेश्वरमध्ये नारायण नागबळी विधीच्या वादातून पुजाऱ्यांच्या दोन गटात हाणामारी - mahadev
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर परिसर या एकाच ठिकाणी नारायण नागबळीचा विधी होतो. देशभरातून हजारो भाविक इथे हे विधी करण्यासाठी येत असतात. त्यामुळे लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल देखील इथे रोज होते असते.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर परिसर या एकाच ठिकाणी नारायण नागबळीचा विधी होतो. देशभरातून हजारो भाविक इथे हे विधी करण्यासाठी येत असतात. त्यामुळे लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल देखील इथे रोज होते असते. अशात त्र्यंबकेश्वरमधील स्थानिक पुजारी आणि प्रातस्थ पुजारी यांच्यातील वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. याच कारणावर आज त्र्यंबकेश्वरमध्ये स्थानिक पुजारी आणि परप्रांतीय पुजाऱ्यामध्ये शिवीगाळ होऊन हाणामारीची घटना घडली आहे. हा वाद भाविकांसमोर झाल्याने त्यांच्यामध्ये पुजाऱ्याबद्दलची प्रतिमा काहीशी वेगळी झाली आहे. या आधी देखील काही महिन्यांपूर्वी पुजारी आणि भाविकांमध्ये दक्षिणावरून हाणामारीची घटना घडली होती. आता हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहचला असून पोलीस याबाबत काय भूमिका घेतात, हे लवकरच कळणार आहे.