नाशिक- शहर पोलिसांनी लॉकडाऊनच्या काळात बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना धडा शिकवण्यासाठी नवी शक्कल लढवली आहे. शहरात संचारबंदीत उल्लंघन करण्यासाठी आता 'सेल्फीश पॉईंट' तयार करण्यात आला आहे.
'बाहेर पडला त्याला कोरोना नडला'; लॉकडाऊनमध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांसाठी पोलिसांनी लढवली शक्कल - नाशिक कोरोना
इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर आणि सहकाऱ्यांनी 'बाहेर पडला त्याला कोरोना नडला' असा सेल्फी पॉईंट तयार केला आहे.
'बाहेर पडला त्याला कोरोना नडला'; लॉकडाऊनमध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांसाठी पोलिसांनी लढवली शक्कल
इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना विनंती करूनही समजत नसल्याने नागरिक रस्त्यावर बिनधास्तपणे फिरताना आढळत आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर आणि सहकाऱ्यांनी 'बाहेर पडला त्याला कोरोना नडला' असा सेल्फी पॉईंट तयार केला आहे. बाहेर पडणाऱयांचा सेल्फी व्हायरल करून त्याला शिक्षा करण्यात येत आहे. या उपक्रमाचे शहरात कौतुक केले जात असून जोरदार चर्चा रंगली आहे.