नाशिक - पोलीस दलातील गुन्हे शाखा विभागाने मोठी कारवाई केली आहे. हल्ल्याचा आणि दुहेरी खुनाचा कट नाशिक पोलिसांनी उधळून लावला. पहिल्यांदाच गुन्हा घडण्याअगोदर प्रतिबंधक गुन्हा नाशिकमध्ये दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.
तीन गावठी कट्ट्यांसह 10 धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आणि चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. फोनवर बोलत असताना शेजारी असलेल्या व्यक्तीने आरोपीचे संभाषण ऐकले आणि त्याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी सिनेस्टाईल पद्धतीनेही धडक आणि मोठी कारवाई केल्याचेही नांगरे पाटील यांनी सांगितले
दुहेरी खुनाचा कट नाशिक पोलिसांनी उधळून लावला - विश्वास नांगरे-पाटील - नाशिक
पोलीस दलातील गुन्हे शाखा विभागाने मोठी कारवाई केली आहे. हल्ल्याचा आणि दुहेरी खुनाचा कट नाशिक पोलिसांनी उधळून लावला. पहिल्यांदाच गुन्हा घडण्याअगोदर प्रतिबंधक गुन्हा नाशिकमध्ये दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.
नाशिक
त्याचबरोबर दुसऱ्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर तलवारी,कोयते, शस्त्रे सुद्धा जप्त केली आहेत. शहरांमध्ये अवैद्य शस्त्रांविरूध्द खूप मोठ्या प्रमाणावर आपण मोहीम राबवत आहोत. त्याचे यश गुन्हा शाखेने मिळवले असल्याचे दिसून येत असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.