नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचे पथक कोकणात दाखल झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल खालच्या थराला जाऊन राणेंनी अपशब्द बोलले आहेत. याप्रकरणी शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलीस ठाण्यात तक्रारर दिली. यानंतर गुन्हा दाखल नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडे यांनी दिलेल्या आदेशानुसार हे पथक कोकणात दाखल झाले आहे. दरम्यान, नारायण राणेंच्या मुंबईतील जुहूतील निवासस्थानासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
नारायण राणेंना अटक होणार?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणे नारायण राणे यांना महागात पडत आहे. नाशिकमध्ये नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी पोलिसात नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार नारायण राणेंविरोधात नाशिकच्या सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या तक्रारीनंतर नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नारायण राणे यांना अटक करण्यात यावी, असे आदेश काढण्यात आल्याचे समजतंय. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक पोलिसांची टीम राणे यांनां अटक करण्यासाठी कोकणात दाखल झाल्याचे समजत आहे. दरम्यान, जनआशिर्वाद यात्रेनिमित्त नारायण राणे आज (24 ऑगस्ट) चिपळूनमध्ये आहेत. येथे नाशिक पोलिसांची टीम पोहोचल्यानंतर त्यांना अटक करणार असल्याचे समजत आहे. त्यामुळे नारायण राणेंना आज अटक होणार का? याकडे लक्ष लागले आहे.
या कायद्या अंतर्गत राणेंवर गुन्हा दाखल