नामपूर (नाशिक) - येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येताच नामपूर परिसरासह संपूर्ण बागलाण तालुक्यात खळबळ उडाली आहे. कोरोनाग्रस्त डॉक्टर मालेगाव येथून ये-जा करतात. त्यांच्या पत्नीलाही करोनाची लागण झाल्याचा अहवाल मालेगाव सामान्य रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाला आहे.
नाशिक : नामपूर ग्रामीण वैद्यकीय अधिकाऱ्यास कोरोनाची लागण, पत्नीही पॉझिटिव्ह
नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मालेगाव येथे वास्तव्यास असलेल्या या डॉक्टरांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल मालेगाव सामान्य रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाला आहे.
नामपूर ग्रामीण वैद्यकीय अधिकाऱ्यास कोरोनाची लागण
नामपूरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना करोनाची लागण झाल्याप्रकरणी मालेगाव सामान्य रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. डांगे यांनी व तालुक्यातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान नामपूर परिसरातील किती रुग्ण या रुग्णालयात आले-गेले याचा शोध आता तालुका वैद्यकीय अधिकारी व प्रशासन घेत आहे. यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, बागलाण वासियांनी खबरदारी घेण्याबरोबरच सतर्क राहण्याची गरज आहे.