नाशिक- मागील वर्षी नाशिक महापालिकेचा स्वच्छ सर्व्हेक्षणाच्या यादीत 67 वा क्रमांक आला होता. मात्र, यंदा टॉप टेनमध्ये येण्यासाठी नाशिक महापालिकेने कंबर कसली आहे. शहरात सुटीच्या दिवशीही अधिकारी व कर्मचारी स्वच्छतेचे काम करत आहेत.
नाशिकचे नाव स्वच्छ सर्वेक्षणाच्या यादीत पहिल्या दहांमध्ये यावे यासाठी, नाशिक पालिकेचे कर्मचारी व अधिकारी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. शहरातील रस्ते, उद्याने, सार्वजनिक स्थळ स्वच्छ करण्यासाठी सुटीच्या दिवशीही काम करत आहेत. त्याचबरोबर सतत प्रबोधन करूनही अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. आजपर्यंत 600 पेक्षा अधिक नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.