महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकच्या महापौरांची बैठक म्हणजे वराती मागून घोडे..

गेल्या तीन दिवसांपासून शहरात पुरजन्य परिस्थिती असताना बैठक न बोलणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या महापौरांनी आज पालिकेत आढावा बैठकीचे आयोजन केले होते. नाशिकच्या महापौरांची ही बैठक म्हणजे वराती मागून घोडे असल्याची टिका विरोधक करत आहेत.

महापौर रंजना भानसी

By

Published : Aug 6, 2019, 10:46 AM IST

नाशिक -गेल्या तीन दिवसांपासून शहरात पुरजन्य परिस्थिती असताना बैठक न बोलणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या महापौरांनी आज पालिकेत आढावा बैठकीचे आयोजन केले होते. नाशिकच्या महापौरांची ही बैठक म्हणजे वराती मागून घोडे असल्याची टीका विरोधक करत आहेत.

महापौर रंजना भानसी

संपूर्ण नाशिक शहर दोन दिवस जलमय झालेले असताना महापौर रंजना भानसी या गायब होत्या. मात्र, शहरातील विस्कळीत झालेला जनजीवन पूर्वस्थितीत येत असताना महापौरांनी त्यांच्या दालनात पालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत पुरजन्य परिस्थिती सतर्क राहण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहे. मात्र, या बैठकी वेळी महापौरांना शहरात पडलेल्या खड्ड्यांची आठवण करून देण्यात आल्यानंतर त्यांची चांगलीच तारंबळ उडाली.

रविवारी शहराचा अनेक भागांमध्ये पाणी असताना महापौर रंजना भानसी मात्र पंचवटीतील एका आमदाराच्या मतदारसंघात आपलं कर्तव्य बजावत होत्या जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या आढावा बैठकीतही महापौरांच्या कारभारावर पक्षातीलच काही लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केल्याची जोरदार चर्चा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details