नाशिक - निफाड तालुक्यातील गाजरावाडी भागातील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वाचविले. त्यानंतर वनविभागाने अथक प्रयत्न करत या बछड्याची त्याच्या आईशी भेट घालून दिली, हा सर्व प्रकार लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
निफाड तालुक्यातील नांदुर मध्यमेश्वर हा धरण परिसरात असल्याने इथे मोठ्या संख्येने बिबट्यांचा वावर आहे. अशातच प्रतापराव पुंड यांच्या शेतात सावजाच्या शोधामध्ये पाच महिन्याचा बिबट्याचा बछडा विहिरीत पडला होता. वनविभागातर्फे त्यास रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर, बिबट्याच्या मादीचा गाजरवाडी परिसरातील शेतकर्यांना त्रास नको म्हणून त्या बछड्याला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर घटनास्थळावर त्या पिल्लाला एक खड्डा खोदून त्यावर जाळी ठेवण्यात आली, बाजूच्या काही अंतरावर एका पिंजऱ्यात वनविभागाचे कर्मचारी बिबट्यावर लक्ष ठेऊन होते.