नाशिक -नाशिकच्या औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल चौफुलीवर हा अपघात झाला होता. सर्व्हिस रोड वरून गुजरात दिशेने सिन्नरकडे जाणाऱ्या ट्रकला धडक दिली. बसची धडक ट्रकच्या डिझेल टाकीला लागल्याने काही वेळातच बस आगीच्या भक्षस्थानी पडली. यात बसमधील 48 प्रवाशांपैकी 12 प्रवाशांचा जळून जागीच मृत्यू झाला होता. या सर्वमृत आत्म्यास शांती मिळावी यासाठी घटनास्थळी उदक शांती हा धार्मिक विधी सपन्न झाला. यावेळी विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली.
नाशिक बस अपघात! घटनास्थळी उदक शांती; सर्वधर्मीय धर्मगुरूंची उपस्थिती - Nashik bus accident Peace breaks out at the scene
औरंगाबाद महामार्गावर काही दिवसांपूर्वी झालेल्या बस अपघातात 12 जणांचा दुर्दैवी होरपळून मृत्यू झाला होता. यानिमित्ताने आज शनिवार (दि. 22 ऑक्टोबर)रोजी घटनास्थळी उदक शांती हा धर्मीक विधी संपन्न झाला आहे. यावेळी सर्व धर्मीय धर्मगुरू उपस्थित होते.
या आधी या ठिकाणी झाली उदक शांती - ज्या ठिकाणी अशा दुर्दैवी घटना घडतात तिथे हिंदू सनातन वैदिक परंपरेनुसार उदक शांती केली जाते. या आधी 2003 कुंभमेळा मध्ये चेंगराचेंगरी होऊन 40 जणांचा मृत्यू झाला. वणी येथे बस दरीत कोसळून 35 जणांचा मृत्यू झाला होता तसेच केदारनाथ मध्ये आलेल्या महाप्रलया नंतर तेथे सुद्धा उदक शांती करण्यात आली होती,या अनुषंगाने बस अपघातात 12 जणांच्या होपळून मृत्यू झालेल्या घटना नंतर घटनास्थळी उदक शांती करण्यात आली,अशी माहिती महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी दिले