चोंडी घाटात कार-ट्रकचा भीषण अपघात; ४ ठार, ३ जखमी - चोंडी घाट
मनमाड-मालेगाव दरम्यान चोंडी घाटात कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत.
नाशिक1
नाशिक - मनमाड-मालेगाव दरम्यान चोंडी घाटात कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे.
कारमधून प्रवास करणारे कुटुंब अलाहाबादहून पुण्याला निघाले होते. अपघातात कारचा चक्काचूर झाला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे.