नाशिक - अनैसर्गिक कृत्य करण्यास नकार दिल्याने एका अल्पवयीन मुलाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना मालेगावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे. फैजान अख्तर अब्दुल रेहमान असे त्या संशयित आरोपीचे नाव आहे.
अनैसर्गिक कृत्यास नकार दिल्याने अल्पवयीन मुलाचा खून; मालेगावात संशयित तरुणाला अटक - nashik latest crime news
अल्पवयीन मुलाचे अपहरण करून अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यास मुलाने नकार दिल्याने त्याचे डोक्यात दगड मारून खून केला असल्याची कबूली आरोपीने दिली आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासणीत शोध लागला
१२ वर्षीय अल्पवयीन मुलगा खेळण्यासाठी गेला असता रात्री उशिरापर्यंत तो परत न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे अपहरणाची फिर्याद दाखल करण्यात आली होती. या फिर्यादीच्या अनुषंगाने पोलिसांनी कसून तपास सुरू केला. तेव्हा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीत फैजान अख्तर अब्दुल रेहमान यावर संशय बळावला. त्यास ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखवताच अल्पवयीन मुलाचे अपहरण करून अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यास मुलाने नकार दिल्याने त्याचे डोक्यात दगड मारून खून केला असल्याची कबुली आरोपीने दिली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे.
एका बांधकाम साईटवर सापडला मृतदेह
मालेगावमधील आझाद नगर पोलीस ठाण्यामध्ये दिनांक २४ मे रोजी रहमताबाद नगर येथे राहणाऱ्या शेख सलीम यानी त्यांचा १२ वर्षाचा मुलगा अरसलान हा हरविला असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी २४ मेपासून सातत्याने शोध घेण्यास सुरुवात केली असता २५ मे रोजी हर्षलचा मृतदेह पवार वाडीतील एका बांधकाम सुरू असलेल्या साईटवर त्याचा मुृतदेह आढळू आला. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी असलेल्या आजूबाजूच्या परिसरातील तांत्रिक विश्लेषण याचा आधार घेत तपास सुरू केला असता तपासावरून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना अरसलानचा खून हा अनैसर्गिक कारणावरून झाल्याचे समोर आले आहे.