नाशिक- भाजप प्रभारी सरोज पांडे यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री भाजपचाच होणार,या पांडे यांच्या विधानानंतर आज शहर शिवसेनेने चक्क भाजप कार्यालयाबाहेर फलक लावत आपला राग व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री सेनेचाच होणार; शिवसैनिकांनी भाजप कार्यालय बाहेर लावले फलक
नाशिक मधील बैठकीत भाजपच्या प्रभारी सरोज पांडे यांनी केलेल्या विधानानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये खदखद वाढली होती. त्यामुळे सेनेकडूनही मुख्यमंत्री सेनेचाच असल्याची बॅनरबाजी करून प्रत्युत्तर देण्यात आले.
"भाजप-शिवसेना युतीचाच मुख्यमंत्री होणार आणि तोही शिवसेनेचाच होणार" अशी बॅनरबाजी शिवसेनेकडून करण्यात येत आहे. नाशिक शहराच्या काही चौकात व ज्या चौकातून भाजप कार्यालयाकडे जाण्याचा रस्ता आहे, त्या रस्त्यावर शिवसेनेतर्फे फलक लावण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, अशी बॅनरबाजी करून शिवसेनेने भाजपाच्या प्रभारी सरोज पांडे यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिले आहे.
एकीकडे दोघेही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी महायुती आणि मुख्यमंत्री पदासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, काल नाशिक मधील बैठकीत भाजपच्या प्रभारी सरोज पांडे यांनी केलेल्या विधानानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये खदखद वाढली होती. त्यामुळे सेनेकडूनही मुख्यमंत्री सेनेचाच असल्याची बॅनरबाजी करून प्रत्युत्तर देण्यात आले.