नाशिक -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाचे करोडो रुपयांचे नुकसान झालं आहे. मात्र, दुसरीकडे याच लालपरीने मालवाहतूकीच्या माध्यमातून जवळपास एकवीस लाखाचे उत्पन्न एसटी महामंडळाला मिळवून दिले आहे. लालपरीला मालवाहतुकीच्या माध्यमातून का होईना आर्थिक रुळावर येण्यास मदत झाली आहे.
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यापासून एसटी महामंडळाने मालवाहतुकीची सुरुवात केली. या लालपरीने राज्याच्या कानाकोपऱ्यात 543 फेर्यांच्या माध्यमातून 21 लाखाचे उत्पन्न मिळवले. प्रवाशांच्या सदैव सेवेत तत्पर असणाऱ्या एसटी बसने प्रवाशांसह आता मालवाहतुकीत देखील यशस्वी कामगिरी बजावली आहे.