नाशिक- राज्य सरकारने अखेर परप्रांतीय मजुरांची पायपीट थांबवली आहे. मध्यरात्रीच मजुरांना त्यांच्या राज्याच्या वेशीपर्यंत मोफत सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मध्यरात्री नाशिक ते कसारा महामार्गावरून पायी जाणाऱ्या परप्रांतीयांना राज्य शासनाच्या बसमधून त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आले आहे.
परप्रांतीय नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारने दिल्या बसेस, राज्याच्या वेशीपर्यंत सोडण्यात येणार
परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्याच्या वेशीपर्यंत सोडण्यासाठी राज्य सरकारने बस पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. या सुविधेला सुरुवात झाली असून नाशिक डेपोतून सात बस सोडण्यात आल्या आहेत.
परप्रांतीय नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारने दिल्या बसेस, राज्याच्या वेशीपर्यंत सोडण्यात येणार
एका बसमध्ये २२ लोकांना बसविण्यात आले असून नाशिक डेपोतून सात बस पहिल्या टप्प्यात सोडण्यात आल्या होत्या. बस मध्ये बसणाऱ्या प्रत्येकाची नोंद करून घेत बस सोडण्यात आल्या आहे. हा सगळा प्रवास मोफत दिला जाणार असून याची सुरुवात नाशिक विभागातून करण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, याकरिता मध्यरात्री हा निर्णय घेतला गेला असावा अशी चर्चा सुरू आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता परप्रांतीय नागरिकाची पायपीट थांबणार आहे.
Last Updated : May 10, 2020, 11:45 AM IST