महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनमाडच्या 'नगिना' मशिदीतील नमाज बंद

जगभरात कोरोनोने अक्षरशः थैमान घातले आहे. त्याचा प्रसार थांबला पाहिजे, यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध प्रयत्न करताना दिसत आहे. भारतातील रेल्वे पहिल्यांदाच पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसेच सर्व खासगी ट्रॅव्हल्सही बंद करण्यात आल्या आहेत. तर देशभरात असलेली सर्व मंदिरे बंद करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनमाडच्या 'नगिना' मशिदीतील नमाज बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनमाडच्या 'नगिना' मशिदीतील नमाज बंद

By

Published : Mar 23, 2020, 6:56 PM IST

नाशिक- कोरोनोचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने विविध निर्णय घेतले आहेत. त्यास जनता देखील मोठ्या प्रमाणावर साथ देत आहे. याचाच एक भाग म्हणून मनमाड शहरातील नगिना मशिदीसह सर्व मशिदीत आजपासून सामूहिक नमाज बंद केली आहे. केवळ मशिदीचे मौलाना व त्यांच्यासह 3 जण नमाज पठण करतील, असा निर्णय घेऊन शहरातील सर्व मशिदी आजपासून बंद करण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनमाडच्या 'नगिना' मशिदीतील नमाज बंद

हेही वाचा -कोरोना इफेक्ट : रस्त्यावर होणारी गर्दी रोखण्यासाठी पोलिसांची ठिकठिकाणी नाकेबंदी

जगभरात कोरोनोने अक्षरशः थैमान घातले आहे. त्याचा प्रसार थांबला पाहिजे, यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध प्रयत्न करताना दिसत आहे.भारतातील रेल्वे पहिल्यांदाच पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसेच सर्व खासगी ट्रॅव्हल्सही बंद करण्यात आल्या आहेत. तर देशभरात असलेली सर्व मंदिरे बंद करण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी एकत्रित जमू नये, म्हणून कलम 144 नुसार जमावबंदी सुरू केली. या सर्व गोष्टींचा विचार करता मनमाड शहरातील नगिना मशिद पुर्णतः बंद करण्यात आली असल्याचा फलक लावण्यात आला आहे. या ठिकाणी आता फक्त आजान दिली जाईल, असा फलक लावण्यात आला आहे. तसेच मौलानांनी देखील सामुदायिक नमाज पठाण बंद केली आहे.

हेही वाचा -कोरोनाचा फटका कांदा बाजारपेठांनाही, आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ बंद

ABOUT THE AUTHOR

...view details