महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करून अल्पवयीन मुलीला ओढले प्रेमाच्या जाळ्यात, नंतर... - molestation by facebook friend latest news nashik

अक्षय नावाच्या तरुणाने फेसबुकच्या माध्यमातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळख निर्माण केली. तसेच अक्षयने प्रेमाच्या शपथा देत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच तुषार नावाच्या मित्राच्या खोलीवर नेऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. हा प्रकार सप्टेंबर 2019 पासून सुरू होता. मात्र, अशात मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला आहे.

molestation by facebook friend in nashik
फेसबुकवरून मैत्रीचे रूपांतर प्रेमात; नंतर...

By

Published : Feb 11, 2020, 3:05 PM IST

Updated : Feb 11, 2020, 3:16 PM IST

नाशिक -फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या तरुणाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची समोर आली आहे. ही घटना शहरातील अंबड भागात घडली. मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संशयित अक्षय हिवाळे (वय - 22, रा. कामटवाडे, अंबड), असे या तरुणाचे नाव आहे.

फेसबुकवरून मैत्रीचे रूपांतर प्रेमात; नंतर...

या तरुणाने फेसबुकच्या माध्यमातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळख निर्माण केली. तसेच अक्षयने प्रेमाच्या शपथा देत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच तुषार नावाच्या मित्राच्या रूमवर नेऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. हा प्रकार सप्टेंबर 2019 पासून सुरू होता. मात्र, अशात मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला आहे. यानंतर पीडित मुलीच्या आईने अंबड पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी संशयित अक्षय हिवाळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा (पॉस्को) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा -नाशिकमध्ये पोलीस ठाण्यासमोर पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू

Last Updated : Feb 11, 2020, 3:16 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details