नाशिक- शहरातील उंटवाडी रोडवरील मुथ्थुट फायनान्सच्या कार्यालयावर सशस्त्र दरोडा झाला होता. या दरोड्याचा मुख्य सूत्रधार सुबोध सिंह आणि त्याच्या टोळीतील ८ साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. परराज्यातील गुन्हेगारी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची ही पहिलीच घटना असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी सांगितले.
१४ जून रोजी नाशिक येथील उंटवाडी रोडवरील मुथ्थुटच्या कार्यालयावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. या दरोड्यात कर्मचारी साजू सॅम्युअल याच्यावर गोळी झाडून त्याची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली व आरोपींचा शोध घेण्यासाठी बारा पथके परराज्यात पाठविली होती. या पथकांकडून संशयितांचा शोध घेत असतांना विजय बहादूर सिंह राजपूत, परमेन्द्र सिंग, आकाश सिंग विजय बहादूर सिंह राजपूत या तिघांना उत्तरप्रदेशातून अटक करण्यात आली.