नाशिक - मोबाईलचा स्फोट झाल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. अशीच घटना नाशिकच्या मोरवाडी परिसरात घडली. राहुल आव्हाड या युवकाने दुपारी चार्जिंगला लावलेल्या फोनचा अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे घरात सगळीकडे धूर पसरला आणि घरातील इतर वस्तूंचे देखील नुकसान झाले.
नाशिक : चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट.. घर हादरले, सामानांचे नुकसान - मोबाईलचा स्फोट
घरात चार्जिंगला लावलेल्या मोबाईल फोनचा अचानक स्फोट झाल्याने घरात सर्वीकडे धूर पसरला. आजूबाजूला असलेल्या साहित्याचे नुकसान झाले.
नाशिकच्या मोरवाडी परिसरात एका घरात चार्जिंगला लावलेला मोबाईलचा अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे घरातील किमती साहित्य जळाल्याने मोठे नुकसान झाले. राहुल आव्हाड या युवकाने त्यांचा एम आय कंपनीचा मोबाईल फोन दुपारच्या सुमारास चार्जिंगला लावला होता. चार्जिंग होत असताना फोनचा अचानक मोठा स्फोट झाल्याने आजूबाजूला असलेल्या इतर वस्तूंचे देखील यामुळे नुकसान झाले आहे. या स्फोटामुळे घरात सगळीकडे धूर पसरला होता. सदर प्रकार लक्षात येताच राहुल यांनी मोबाईल बाहेर फेकल्यामूळे आधिकचे नुकसान टळले.
अशा घटना दिवसेंदिवस वाढत असून अशा प्रकारांमुळे कोणाच्या जीवाला धोका देखील पोहोचू शकतो हे मात्र नक्की. त्यामुळे मोबाइल कंपन्यांनी ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यातील संभाव्य धोका टाळता येईल.