नाशिक -औरंगाबाद शहराचे नामांतर करून या शहराला संभाजीनगर हे नाव द्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे आली आहे. रविवारी (दि. 3 जाने.) नाशिकमध्ये एस.टी.बसवर छत्रपती संभाजीनगर, असे फलक लावत मनसेने आंदोलन केले. 26 जानेवारीपर्यंत औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर, करा अशी मागणी राज्य सरकारला देण्यात आला आहे.
तत्कालीन नगरसेवकाने नामांतराविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती याचिका
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 साली औरंगाबाद येथील सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर विजयी सभेत बोलतांना शहराचे नाव औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर ठेवत असल्याची घोषणा केली होती. जून 1995 मध्ये औरंगाबाद महापालिकेत छत्रपती संभाजीनगर, असे नामकरण करण्याच्या मंजूर झालेल्या ठरावाला राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरीही मिळाली होती. यास काँग्रेसच्या तत्कालीन नगरसेवकाने याविरोधात उच्च व नंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.