नाशिक - जिल्हा परिषदेतील लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधकाम निविदा प्रक्रियेत अनियमितता केल्याची तक्रार आमदार नरहरी झिरवाळ यांनी केली होती. मात्र जिल्हा परिषदेतून सिमेंट काँक्रीट बांधकामाची मुख्य फाईल गायब झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आमदार नरहरी झिरवाळ यांनी जिल्हा परिषदेत रात्रभर ठिय्या आंदोलन केले.
नाशिक जिल्हा परिषदेत आमदार नरहरी झिरवाळ यांचे मध्यरात्री ठिय्या आंदोलन
जिल्हा परिषदेतून सिमेंट काँक्रीट बांधकामाची मुख्य फाईल गायब झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आमदार नरहरी झिरवाळ यांनी जिल्हा परिषदेत रात्रभर ठिय्या आंदोलन केले.
दिंडोरी तालुक्यातील चौसाळे व सावरपातळी गावाजवळ बंधाऱ्याच्या सिमेंट कॉंक्रीट बंधारे याबाबतच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता केल्याची ही तक्रार होती. मात्र या सिमेंट काँक्रीट बंधाऱ्याची मुख्य फाईल नाशिक जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातून गहाळ झाल्याचे अधिकारी सांगत आहे. याचा निषेध म्हणून आमदार नरहरी झिरवाळ यांनी रात्रभर जिल्हा आवारात ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत प्रकरणाची सखोल चौकशी करून खुलासा करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. त्यांच्यासोबत इतर राजकीय पदाधिकारी देखील सहभागी झाले होते.