नाशिक - कोरोनाच्या लढाईत यशस्वी होण्यासाठी रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये मुस्लीम बांधवांनी मशीद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी न जमता घरातच नियमित नमाज प्रार्थना व धार्मिक कार्यक्रम करावेत, असे आवाहन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. तसेच मुस्लीम बांधवांसह सर्व जनतेला रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुस्लीम बांधवांनी घरात राहूनच नमाज पठण व प्रार्थना करावी; भुजबळ यांचे आवाहन
धर्मगुरूंनीदेखील रमजान महिन्यात घरात राहून नमाज पठाण करावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे. रमजानच्या कामात प्रशासनाच्या वतीने सर्व सोयीसुविधा उपलब्ध होतील यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.
पवित्र रमजान महिना सुरू झाला आहे. मात्र, जगभरात आणि देशात सर्वत्र कोरोनाचे थैमान सुरू आहे. दुर्दैवाने यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडत असून लाखो लोक यामुळे आजारी पडत आहे. अशाप्रसंगी हा कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू नये म्हणून एकच उपाय आहे तो म्हणजे गर्दी टाळणे, एकमेकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून काम करणे. या माध्यमातूनच त्यावर आळा घातला जाऊ शकतो. त्यामुळे रमजानच्या पवित्र महिन्यात नमाज पठण व इतर धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र येऊन जर धार्मिक कार्यक्रम केले तर धोकाही निर्माण होऊ शकतो, असेही भुजबळ म्हणाले.
धर्मगुरूंनीदेखील रमजान महिन्यात घरात राहून नमाज पठाण करावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले आहे. रमजानच्या कामात प्रशासनाच्या वतीने सर्व सोयीसुविधा उपलब्ध होतील यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. रमजानच्या काळात फळांची तसेच अत्यावश्यक साहित्याची दुकाने वेळेत उघडतील. सर्व बांधवांनी गर्दी न करता अंतर पाळूनच खरेदी करावी. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण यश मिळवू शकतो. यासाठी पवित्र रमजानच्या महिन्यामध्ये आपण घरात राहूनच नमाज पठण व प्रार्थना करूया, असे आवाहन त्यांनी केले आहे.