नाशिक - जिल्ह्यात 25 दिवसाच्या मिनी लॉकडाऊनला सुरूवात झाली आहे. शासन निर्णयानंतर सर्व दुकाने बंद असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे. मात्र, दुसरीकडे इतर उद्योगधंदे, सार्वजनिक वाहतूक सुरू असल्याने रस्त्यावर 40 टक्के वर्दळ दिसून येत आहे.
नाशकात 25 दिवसांच्या मिनी लॉकडाऊनला सुरवात मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट
राज्यासह नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून रोज हजारो रुग्ण आढळून येत आहेत. तर कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. कोरोनावर आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ह्या निर्णयाला नाशिककरांनी चांगला प्रतिसाद दिला असून शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या शालिमार, सीबीएस, मेनरोड, एमजीरोड, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, भद्रकाली आदी भागातील दुकाने बंद ठेवली आहेत. परिणामी ह्या भागात शुकशुकाट दिसून येत आहे.
रस्त्यावर वर्दळ
जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत मिनी लॉकडाऊन जरी लागू केला असला तरी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, दवाखाने, मेडिकल, कृषी साधने दुकाने, हॉटेल पार्सल, फळविक्रेते, स्वीट मार्ट, चिकन- मटण शॉप सुरू आहेत. तसेच उद्योग कंपन्या, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू असल्याने रस्त्यावर 40 टक्के नागरिकांची वर्दळ दिसून येत आहे.
हेही वाचा -'अँटिलियासमोर गाडी कुणी ठेवली याचा तपास आधी झाला पाहिजे'