नाशिक :नाशकात मध्यरात्री बिबट्याचा धुमाकूळ, बंगल्यात बिबट्या शिरला. नाशिककर आणि बिबट्या हे जणू समीकरण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात बिबट्याचा वावर हा वाढला ( The leopards range increased ) आहे. वडाळारोडवरील नागजी भागातील आयेशा नगर परिसरातील बिबट्याला वनविभागाच्या टीमने ( forest department team) मोठ्या शिताफीने बंगल्याच्या पार्किंग मधून रात्री 12:15 वाजता जेरबंद केले.
पोलीस व वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन केले सुरू : नाशिक शहरातील नागजी भागातील 22 नोव्हेंबर च्या रात्री 10.30 वाजेच्या सुमारास बिबट्या दिसून आल्याने खळबळ उडाली होती.घटनेची माहिती मिळताच वन विभाग घटनास्थळी दाखल झाले. लोकांच्या गोंधळामुळे बिबट्या घाबरून एका बंगल्यातून दुसऱ्या बंगल्यात उड्या मारत जात होता. बिबट्याच्या वावरमुळे महिला व लहान मुले घाबरलेल्या अवस्थेत होते. पोलीस व वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आणि चारही बाजूने जाळ्या टाकून बिबट्याला बेशुद्ध होणारे इंजेक्शन देत जेरबंद केले. बिबट्याला पाहण्यासाठी परिसरात मोठी गर्दी झाल्याने पोलिसांना आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना गर्दीला दूर करणे कठीण झाले होते.