महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maratha Reservation: अशोक चव्हाण मराठा समाजाचा घात करत आहे - मराठा क्रांती मोर्चा - मराठा आरक्षण

मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल तर अशोक चव्हाण यांच्या पोटात का दुखतं? असा सवाल देखील यावेळी मराठा क्रांती मोर्चाकडून उपस्थित करण्यात आला.

मराठा क्रांती मोर्चा
मराठा क्रांती मोर्चा

By

Published : Aug 5, 2021, 3:15 PM IST

Updated : Aug 5, 2021, 3:27 PM IST

नाशिक -मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि राज्य सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा नाशिक मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. आरक्षण संदर्भात केंद्राने घटना दुरुस्ती करत आरक्षण संदर्भात निर्णयाचे अधिकार राज्याला दिले असताना सुद्धा आरक्षण बाबत बेताल वक्तव्य अशोक चव्हाण करत असल्याचा गंभीर आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल तर अशोक चव्हाण यांच्या पोटात का दुखतं? असा सवाल देखील यावेळी मराठा क्रांती मोर्चाकडून उपस्थित करण्यात आला.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक
'9 ऑगस्टला पुण्यात राज्यव्यापी बैठक होणार'

अशोक चव्हाण यांना तातडीने उपसमितीच्या अध्यक्ष पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार असल्याचे मराठा क्रांती समन्वयकांनी सांगितले आहे. तसेच ही मागणी मान्य झाली नाही तर येणाऱ्या काळात आंदोलन करण्याचा इशारा नाशिक मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे. मागास प्रवर्ग ठरवून आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांना देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळ समितीने मंजूर केल्याने आता मराठा आरक्षण विषय राज्याने व्यवस्थित हाताळला पाहिजे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा समितीने केली आहे. 102 व्या घटनादुरूस्तीनंतर राज्यांना मागास प्रवर्ग ठरविण्याचे अधिकार राहत नसल्याचे नमूद करत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले होते. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने विधेयक आणून राज्यांना पुन्हा एकदा हा अधिकार देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षण मुद्दा लवकर निकाली काढला पाहिजे. मात्र अगोदर अशोक चव्हाण यांची उचलबांगडी करण्याची गरज आहे. मागण्या का मान्य केल्या नाहीत असा प्रश्न मराठा क्रांती मोर्चा समितीने उपस्थित केला आहे. यासंदर्भात येत्या 9 ऑगस्टला पुणे येथे छत्रपती खासदार संभाजी राजे यांच्या उपस्थितीत मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी बैठक होणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितले आहे.

Last Updated : Aug 5, 2021, 3:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details