महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दोन व्यापाऱ्यांच्या वादामुळे बाजार समिती बेमुदत बंद; शेतकऱ्यांसमोर मोठे संकट - मनमाड बाजार समितीमधील ताज्या बातम्या

मुंबई, नाशिक, गुजरात आणि मध्यप्रदेशला भाजीपाला निर्यात करणाऱ्या मनमाड बाजार समितीत दोन व्यापाऱ्यांमध्ये भांडण झाले. यानंतर बाजार समितीच्या वतीने बाजार समितीतील भाजीपाला लिलाव बेमुदत बंद करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती

By

Published : Aug 8, 2020, 12:51 PM IST

मनमाड (नाशिक) - मनमाड बाजार समितीत आजपासून भाजीपाला लिलाव बेमुदत बंद करण्यात आला आहे. दोन व्यापाऱ्यामध्ये वाद होऊन हाणामारी झाल्यामुळे बाजार समिती प्रशासनाने लिलाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समितीतून नाशिक, मुंबईसह गुजरातला भाजीपाला पुरवठा केला जातो. मात्र, आता लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे.

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज सकाळच्या सत्रात दोन व्यापाऱ्यांमध्ये काहीतरी कारणावरून शाब्दिक चकमक उडाली. यातूनच पुढे भांडण होऊन हाणामारी झाली. यामुळे काहीकाळ वातावरण तापले होते. यानंतर बाजार समितीच्या वतीने बाजार समितीतील भाजीपाला लिलाव बेमुदत बंद करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. बाजार समितीचे व्यवहार ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. मनमाड येथे तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यातील देखील शेतकरी बांधव मालविक्री करण्यासाठी येत असतात. मात्र आता या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

मनमाड बाजार समितीतून मुंबई, नाशिक, गुजरात आणि मध्यप्रदेश येथे मोठ्या प्रमाणात भाजीपाला निर्यात करण्यात येतो. यामुळे या ठिकाणी देखील भाजीपाल्याचा तुटवडा भासणार आहे. अचानक झालेल्या या वादामुळे बाजार समितीने बेमुदत लिलाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याचा सगळ्यात जास्त फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

हेही वाचा -दिलासादायक..! आता सोन्याच्या बदल्यात मिळणार अधिक कर्ज; आरबीआयच्या मार्गदर्शकतत्त्वांमध्ये बदल

ABOUT THE AUTHOR

...view details